SKs Podcast

Sachin Pradip Khare

SKs-Podcast - This is music history / music commentary podcast. I more talk about the feelings, expressions, little bit history of the songs and some of the stories while making the song. #musicpodcast #skspodcast #skpodcast #skpodcast #marathisangeet #hindisangeet #bhavgeet #musichistory #musiccommentary #musicanchoring #bhavgeet read less
MusicMusic

Episodes

Dil Kyon Ye Mera Shor Kare..... दिल क्यों ये मेरा शोर करे #kk #kksongs #kites #bollywoodmusic #SKs
24-08-2023
Dil Kyon Ye Mera Shor Kare..... दिल क्यों ये मेरा शोर करे #kk #kksongs #kites #bollywoodmusic #SKs
आत्ता पर्यंत ७० ते ८० च्या दशकातली गाणी मी सादर केली. आत्ता जे गाणं मी सादर करणार आहे ते थोडंसं नव्या काळातील. म्हणजे २०व्या शतकातले. हे गाणं नव्या पिढीचे असले तरी खूप शांत, संयमी, विचारांनी आणि शब्दांनी एकदम खोलवर नेणारे आहे. सुरवातीपासूनच मनाचा आणि हृदयाचा ताबा घेणारे हे गाणे आणि त्यात KK चा आवाज म्हणजे cherry on a top असेच म्हणणे योग्य ठरेल. हमिंग चा तर आवाज अगदीच लाजवाब आहे. प्रचंड गोडवा ह्या गाण्यात आहे, आणि गाण्याच्या माधुर्यामध्ये केशर रुपी शब्दरचनेने  रंग आणला आहे. गाण्याच्या मध्ये गिटार चा उत्तम वापर केला आहे. गाण्यात किती छान अर्थ दडला आहे....हृदयात कल्लोळ माजला आहे पण काहीही झालं तरी इकडे तिकडे न भरकटता हृदय तुझ्याकडेच धाव घेतय. एका क्षणात असं काय झालं की तुला बघता क्षणीच मी मला स्वतःला विसरून गेलो....ती लोकांच्या घोळक्यात रमली आहे पण मी.....मी तर प्रेमाच्या विचारात एकटाच फिरतोय.......पाहताक्षणी प्रेम होणं म्हणजे हेच..... प्रेम तर नक्कीच आहे आणि त्याच्या असण्यामुळे "दिलं क्यों ये मेरा शोर करे" असं होतंय. ही रस्सीखेच अनेक जणांनी अनुभवली असेल, हो ना? २०१० मधल्या काईट्स ह्या चित्रपटातील हे गाणं, ह्याला संगीत दिलं राजेश रोशन यांनी, शब्दरचना नासीर फराज आणि KK ने मस्त आवाजात सादर झालेले हे गाणे ऐकुयात. "दिल क्यों ये मेरा शोर करे......इधर नही, उधर नही तेरी और चले" #hindisongs #kkhits #bollywood #lovesong #love songs #melody #podcast #nivedan #निवेदन #songs #SKs #SKspodcast --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sks-gappa-aani-tappa/message
Ajeeb dastan hai ye...kaha shuru kaha khatam .....अजीब दास्ता है ये, कहा शुरू कहा खतंम.....
04-08-2023
Ajeeb dastan hai ye...kaha shuru kaha khatam .....अजीब दास्ता है ये, कहा शुरू कहा खतंम.....
अजीब दास्ता है ये, कहा शुरू कहा खतंम..... एखादं गाणं ऐकलं की ते उत्साहपूर्ण आहे, उडत्या लयीच आहे,  हर्शभरीत आहे का थोडे दुःखी आहे ह्यापलिकडे सुद्धा त्याचे सादरीकरण कसे आहे, त्याची धून कशी आहे आणि त्याच्यातला सार काय ह्यावर त्याची लोकप्रियता ठरते. आपोआप गाणं  गुणगुणत बसावं असं वाटतं.  माझ्या वयाच्या किंवा माझ्या आधीच्या पिढीच्या ओठांवराचं हे गाणं. या गाण्यातील ओळी खूप काही सांगून जातात. ह्या गाण्यातील भाव, राग, रंग आणि रस मनाला स्पर्श करून जातात. आजूबाजूच्या सत्य परिस्थितीचा विसर पडतो. राज कुमार, मीना कुमारी आणि नादिरा यांवर चित्रित केलेले गाणे खूप लोकप्रिय झाले. कृष्णधवल चित्रीकरण त्याला अजून उठाव देते. उदास गाण्याला थोडेसे उडत्या लयीच संगीत ह्या गाण्याला दिलंय. गिटारचा अप्रतिम वापर, कोरस ने दिलेली अप्रतिम साथ हे गाण्याचे वैशिष्ट्य. प्रेमी युगुल एकमेकांवर खूप प्रेम करत असतात, जन्मजन्मंतरीची साथ देण्याचे आशा त्यांच्या मनात असते पण समोर परिस्थितीच अशी उभी रहाते की हे सगळं भंग पावते. काव्य खूप प्रतिभाशाली, अर्थपूर्ण आहे. शब्द न शब्द मनाला आणि काळजाला भिडतो.  विरह प्रकट करण्याची ताकद अप्रतिम शब्दरचना गुंफली गेली आहे. गाण्यातली दोन कडवी मला स्वतःला खूप भावली आहेत, ती म्हणजे " ये ख्वाब देखती हू मैं, के जग पडी हू ख्वाब से" आणि "किसी के इतने पास हो, के सबसे दूर हो गये".....शब्द मनाला छेदून जातात. खरं प्रेम हे कधीच विसरता येत नाही. त्या प्रेमावरचा विश्वास कधीच तुटत नाही. सत्य परिस्थिती जरी वेगळी असली तरी त्या प्रेमाला अर्थ असतो. प्रत्येक संध्याकाळ त्या प्रेमाची आठवण करू देतेच. १९६० च्या दशकातल्या "दिलं अपना और प्रीत परायी" ह्या चित्रपटातील हे गाणं, शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेले,  शैलेंद्र यांची अर्थपूर्ण, भावपूर्ण शब्दरचना आणि दीदींच्या आवाजाने उठावदार झालेले पुढील गाणे ऐकुयात....."अजीब दास्ता है ये, कहा शुरू कहा खतंम....." #dilapnaaurpreetparai #ajeebdastan #shankarjaikishan #shailendra #latamangeshkar #didi #latadidi #SK #Skspodcast #musicpodcast #Sksmusicpodcast #music #anchoring #nivedan #marathinivedan --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sks-gappa-aani-tappa/message
Jindagi kaisi hai paheli Haye - Anand .....जिंदगी कैसी है पहेली हाये, कभी तो हसाये कभी ये रुलाये
29-07-2023
Jindagi kaisi hai paheli Haye - Anand .....जिंदगी कैसी है पहेली हाये, कभी तो हसाये कभी ये रुलाये
१९७०/७१ च्या दशकातला "आनंद" हा सिनेमा. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, सीमा आणि रमेश देव यांच्या दमदार अभिनयाने, चित्रपटाने जो संदेश दुनियेला दिला त्याने ह्या चित्रपटाला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले. उत्कृष्ठ, सदाबहार गाणी हे अजून एक वैशिष्ट्य ह्या चित्रपटाचं. हे गाणं चित्रपटाचं शीर्षक गीत म्हणून ठरलं होतं पण गाणं ऐकल्यानंतर राजेश खन्ना यांनी हे गाणं त्यांच्यावर चित्रित करण्याची विनंती केली, एवढं चांगलं गाणं शीर्षक गीत म्हणून वापरून त्याचं महत्त्व कमी करू नये अशी त्यामागची भावना होती. कुठल्याही साथी शिवाय गायलेले मन्ना डे यांचे हे पहिले गाणे. ह्या गाण्यात ५ कडवी होती पण चित्रपटात २ च कडवी आहेत. हे गाणे त्याकाळी केवळ ३ तासात  चित्रित झाले. कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी झुंज देणाऱ्या आनंदची भूमिका राजेश खन्ना यांनी खूपच छान पार पाडली आहे आणि अमिताभ बच्चन यांनी डॉक्टर आणि मित्र ही भूमिका. कर्करोग ह्या रोगाशी हसतमुख झुंज देणाऱ्या दोन व्यक्ती मी याची देही याची डोळा बघितल्या आहेत त्या म्हणजे माझी अनिता आत्या आणि लिमये काका. चित्रपटातील हे गाणं समुद्रकिनारी चित्रित झाले आहे आणि खूप सूचक चित्रीकरण केलं आहे. समुद्राच्या लाटा जोरात किनाऱ्यावर धडकतात आणि त्या परत सागरात हळूवारपणे मिसळून जातात. आयुष्यात येणारा प्रत्येक प्रसंग हा ह्या लाटांसारखा आहे, सुखदुःखाची एक झलक प्रत्येक प्रसंग देऊन जातो आणि त्याला हसतमुख, तितक्याच निर्धाराने जगायची उर्मी देतो. मंनाडे यांनी गायलेले, सलील दा यांनी संगीतबद्ध केलेले आणि योगेश यांनी लिहिलेले हे पुढील गाणे ऐकुयात....."जिंदगी कैसी है पहेली हाये, कभी तो हसाये कभी ये रुलाये".... #anand #RajeshKhanna #Amitabhbacchan #babumoshay #babumoshoi #mannade #Salilda #yogesh #ANAND #anandmovie --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sks-gappa-aani-tappa/message