Jindagi kaisi hai paheli Haye - Anand .....जिंदगी कैसी है पहेली हाये, कभी तो हसाये कभी ये रुलाये

SKs Podcast

29-07-2023 • 6 mins

१९७०/७१ च्या दशकातला "आनंद" हा सिनेमा. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, सीमा आणि रमेश देव यांच्या दमदार अभिनयाने, चित्रपटाने जो संदेश दुनियेला दिला त्याने ह्या चित्रपटाला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले. उत्कृष्ठ, सदाबहार गाणी हे अजून एक वैशिष्ट्य ह्या चित्रपटाचं. हे गाणं चित्रपटाचं शीर्षक गीत म्हणून ठरलं होतं पण गाणं ऐकल्यानंतर राजेश खन्ना यांनी हे गाणं त्यांच्यावर चित्रित करण्याची विनंती केली, एवढं चांगलं गाणं शीर्षक गीत म्हणून वापरून त्याचं महत्त्व कमी करू नये अशी त्यामागची भावना होती. कुठल्याही साथी शिवाय गायलेले मन्ना डे यांचे हे पहिले गाणे. ह्या गाण्यात ५ कडवी होती पण चित्रपटात २ च कडवी आहेत. हे गाणे त्याकाळी केवळ ३ तासात  चित्रित झाले. कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी झुंज देणाऱ्या आनंदची भूमिका राजेश खन्ना यांनी खूपच छान पार पाडली आहे आणि अमिताभ बच्चन यांनी डॉक्टर आणि मित्र ही भूमिका. कर्करोग ह्या रोगाशी हसतमुख झुंज देणाऱ्या दोन व्यक्ती मी याची देही याची डोळा बघितल्या आहेत त्या म्हणजे माझी अनिता आत्या आणि लिमये काका. चित्रपटातील हे गाणं समुद्रकिनारी चित्रित झाले आहे आणि खूप सूचक चित्रीकरण केलं आहे. समुद्राच्या लाटा जोरात किनाऱ्यावर धडकतात आणि त्या परत सागरात हळूवारपणे मिसळून जातात. आयुष्यात येणारा प्रत्येक प्रसंग हा ह्या लाटांसारखा आहे, सुखदुःखाची एक झलक प्रत्येक प्रसंग देऊन जातो आणि त्याला हसतमुख, तितक्याच निर्धाराने जगायची उर्मी देतो. मंनाडे यांनी गायलेले, सलील दा यांनी संगीतबद्ध केलेले आणि योगेश यांनी लिहिलेले हे पुढील गाणे ऐकुयात....."जिंदगी कैसी है पहेली हाये, कभी तो हसाये कभी ये रुलाये"....

#anand #RajeshKhanna #Amitabhbacchan #babumoshay #babumoshoi #mannade #Salilda #yogesh #ANAND #anandmovie

--- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sks-gappa-aani-tappa/message