Ajeeb dastan hai ye...kaha shuru kaha khatam .....अजीब दास्ता है ये, कहा शुरू कहा खतंम.....

SKs Podcast

04-08-2023 • 7 mins

अजीब दास्ता है ये, कहा शुरू कहा खतंम..... एखादं गाणं ऐकलं की ते उत्साहपूर्ण आहे, उडत्या लयीच आहे,  हर्शभरीत आहे का थोडे दुःखी आहे ह्यापलिकडे सुद्धा त्याचे सादरीकरण कसे आहे, त्याची धून कशी आहे आणि त्याच्यातला सार काय ह्यावर त्याची लोकप्रियता ठरते. आपोआप गाणं  गुणगुणत बसावं असं वाटतं.  माझ्या वयाच्या किंवा माझ्या आधीच्या पिढीच्या ओठांवराचं हे गाणं. या गाण्यातील ओळी खूप काही सांगून जातात. ह्या गाण्यातील भाव, राग, रंग आणि रस मनाला स्पर्श करून जातात. आजूबाजूच्या सत्य परिस्थितीचा विसर पडतो. राज कुमार, मीना कुमारी आणि नादिरा यांवर चित्रित केलेले गाणे खूप लोकप्रिय झाले. कृष्णधवल चित्रीकरण त्याला अजून उठाव देते. उदास गाण्याला थोडेसे उडत्या लयीच संगीत ह्या गाण्याला दिलंय. गिटारचा अप्रतिम वापर, कोरस ने दिलेली अप्रतिम साथ हे गाण्याचे वैशिष्ट्य. प्रेमी युगुल एकमेकांवर खूप प्रेम करत असतात, जन्मजन्मंतरीची साथ देण्याचे आशा त्यांच्या मनात असते पण समोर परिस्थितीच अशी उभी रहाते की हे सगळं भंग पावते. काव्य खूप प्रतिभाशाली, अर्थपूर्ण आहे. शब्द न शब्द मनाला आणि काळजाला भिडतो.  विरह प्रकट करण्याची ताकद अप्रतिम शब्दरचना गुंफली गेली आहे. गाण्यातली दोन कडवी मला स्वतःला खूप भावली आहेत, ती म्हणजे " ये ख्वाब देखती हू मैं, के जग पडी हू ख्वाब से" आणि "किसी के इतने पास हो, के सबसे दूर हो गये".....शब्द मनाला छेदून जातात. खरं प्रेम हे कधीच विसरता येत नाही. त्या प्रेमावरचा विश्वास कधीच तुटत नाही. सत्य परिस्थिती जरी वेगळी असली तरी त्या प्रेमाला अर्थ असतो. प्रत्येक संध्याकाळ त्या प्रेमाची आठवण करू देतेच. १९६० च्या दशकातल्या "दिलं अपना और प्रीत परायी" ह्या चित्रपटातील हे गाणं, शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेले,  शैलेंद्र यांची अर्थपूर्ण, भावपूर्ण शब्दरचना आणि दीदींच्या आवाजाने उठावदार झालेले पुढील गाणे ऐकुयात....."अजीब दास्ता है ये, कहा शुरू कहा खतंम....."


#dilapnaaurpreetparai #ajeebdastan #shankarjaikishan #shailendra #latamangeshkar #didi #latadidi #SK #Skspodcast #musicpodcast #Sksmusicpodcast #music #anchoring #nivedan #marathinivedan


--- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sks-gappa-aani-tappa/message