Dil Kyon Ye Mera Shor Kare..... दिल क्यों ये मेरा शोर करे #kk #kksongs #kites #bollywoodmusic #SKs

SKs Podcast

24-08-2023 • 8 mins

आत्ता पर्यंत ७० ते ८० च्या दशकातली गाणी मी सादर केली. आत्ता जे गाणं मी सादर करणार आहे ते थोडंसं नव्या काळातील. म्हणजे २०व्या शतकातले. हे गाणं नव्या पिढीचे असले तरी खूप शांत, संयमी, विचारांनी आणि शब्दांनी एकदम खोलवर नेणारे आहे. सुरवातीपासूनच मनाचा आणि हृदयाचा ताबा घेणारे हे गाणे आणि त्यात KK चा आवाज म्हणजे cherry on a top असेच म्हणणे योग्य ठरेल. हमिंग चा तर आवाज अगदीच लाजवाब आहे. प्रचंड गोडवा ह्या गाण्यात आहे, आणि गाण्याच्या माधुर्यामध्ये केशर रुपी शब्दरचनेने  रंग आणला आहे. गाण्याच्या मध्ये गिटार चा उत्तम वापर केला आहे. गाण्यात किती छान अर्थ दडला आहे....हृदयात कल्लोळ माजला आहे पण काहीही झालं तरी इकडे तिकडे न भरकटता हृदय तुझ्याकडेच धाव घेतय. एका क्षणात असं काय झालं की तुला बघता क्षणीच मी मला स्वतःला विसरून गेलो....ती लोकांच्या घोळक्यात रमली आहे पण मी.....मी तर प्रेमाच्या विचारात एकटाच फिरतोय.......पाहताक्षणी प्रेम होणं म्हणजे हेच..... प्रेम तर नक्कीच आहे आणि त्याच्या असण्यामुळे "दिलं क्यों ये मेरा शोर करे" असं होतंय. ही रस्सीखेच अनेक जणांनी अनुभवली असेल, हो ना? २०१० मधल्या काईट्स ह्या चित्रपटातील हे गाणं, ह्याला संगीत दिलं राजेश रोशन यांनी, शब्दरचना नासीर फराज आणि KK ने मस्त आवाजात सादर झालेले हे गाणे ऐकुयात. "दिल क्यों ये मेरा शोर करे......इधर नही, उधर नही तेरी और चले" #hindisongs #kkhits #bollywood #lovesong #love songs #melody #podcast #nivedan #निवेदन #songs #SKs #SKspodcast


--- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sks-gappa-aani-tappa/message