पोलिसांकडून आपल्याला हे शिकायला मिळतं.. EP 57 - Ft PRAMOD PHALNIKAR

Inspiration Katta : Marathi Podcast - इन्स्पिरेशन कट्टा - मराठी पॉडकास्ट

07-10-2023 • 1 hr 11 mins


श्री प्रमोद श्रीपाद फळणीकर हे मध्यप्रदेश कॅडर चे IPS ऑफिसर. त्यांनी तिथे अनेक ठिकाणी सेवा दिली. त्यानंतर ते ITBP ( इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस ) ; NSG ( नॅशनल सेक्युरिटी गार्ड ) ; CISF ( सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स ) अश्या महत्वाच्या संस्थांमध्ये काम केलं.


CISF मध्ये असताना संपूर्ण भारतातल्या विमानतळांची सुरक्षा त्यांच्या अधिकाराखाली होती.


त्यांच्या करिअर मध्ये अनेक रोमांचक घटना घडल्या, पण इन्स्पिरेशन कट्टा वर गप्पा मारताना आपण सरांकडून जास्तीत जास्त शिकता येईल ह्या उद्देशाने त्या घटनांवर एपिसोड आधारित न ठेवता पोलिसांकडून एकंदरीत आपण सर्वसामान्यांना काय शिकता येईल ह्या बद्दल चर्चा केली.


IPS मध्ये त्यांची सुरवात थोडी उशिरा झाली, त्यामुळे त्यांना काही अडचणी आल्या का ? करिअर मध्ये एखादी गोष्ट मिळायला उशीर झाला तर त्यांनी पुढच्या आयुष्यात काही नुकसान होतं का ? त्याच्याशी कसं डील करायचं ?


आपल्याला वाटतं आयुष्यात कुठलही शिक्षण पूर्ण करणं म्हणजे परीक्षा पास होण. पण IPS झाल्यावरही सतत अभ्यास करायला लागतो, update राहायला लागतं. इतक्या व्यस्त दिनक्रमांतून ते नवीन शिक्षणाला कसं प्राधान्य देतात ? सिव्हिलिअन्स स्वतःला update ठेऊ शकतात का ?


जो माणूस फील्ड work करतो त्याला paper work चा खूप कंटाळा येतो, पण पोलिसांना दोन्ही काम करणं क्रमप्राप्त होत. हे कसं जमतं ?


आपल्याला वाटतं आपला जॉब हा thankless आहे, पण law enforcement agencies पेक्षा जास्त thankless job कोणाचा असू शकेल? असं असलं तरी काम करायचं inspiration कसं मिळतं ?


अश्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा करून सरांकडून खूप छान शिकायचा हा प्रयत्न..



सरांचा मोबाईल नंबर - ९००११९४३६७४



#inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी





ऑडिओ लोगो क्रेडिट - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/


--- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message