Inspiration Katta : Marathi Podcast - इन्स्पिरेशन कट्टा - मराठी पॉडकास्ट

मी Podcaster

A Marathi podcast for personal development journey. आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे ! जे काम करतो आहे त्यात मजा येत नाही आहे ! जिथे काम करतो आहे त्यात बदल हवासा वाटतो आहे ! ज्या लोकांबरोबर राहतो आहे त्यात काहीतरी चुकीचं वाटत आहे ! सगळं सुरळीत आहे पण कसली तरी कमी आहे.. काहीतरी, मीठ, तिखट, लिंबू काही तरी कमी आहे. आयुष्याच्या ध्येयाचा शोध चालू आहे, पण तो सापडत नाही आहे. तुम्ही आयुष्याच्या अश्या टप्प्यावर असाल तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठी आहे.. नक्की ऐका read less
EducationEducation

Episodes

EP 62 - कॉर्पोरेट जॉब ते आवडते काम - मार्ग कसा शोधावा ? Ft -Sharayu Sawant
24-11-2023
EP 62 - कॉर्पोरेट जॉब ते आवडते काम - मार्ग कसा शोधावा ? Ft -Sharayu Sawant
कॉर्पोरेट मध्ये काम करता आहे का ? वयाची तिशी पार केली आहे ? असं असेल तर हा एपिसोड तुमच्यासाठी आहे. कॉर्पोरेट जॉब मध्ये कंटाळा येणं, निराशा येणं, वरिष्ठांशी भांडण होणं, नको तितक्या स्पर्धेचा तिटकारा येणं असे अनेक प्रकार खूप घडतात. त्यातून पुढे चुकीचे निर्णय घेणं, नैराश्य येणं, वर्क-लाईफ बॅलेन्स बिघडणं अशे प्रकार घडतात. त्यांचा परिणाम घरी भांडण, मुलांवर चिडचिड आणि मानसिक आजार ह्या पर्यंत होतो. ज्या वेळेला पहिल्यांदा असं वाटायला सुरवात होते ना कि हे काम माझ्या साठी नाही, त्या वेळेलाच ह्या सगळ्याची सुरवात कदाचित झालेली असते. पण आपण ते सहन करत राहतो आणि एक दिवस ज्याला टिपिंग पॉइंट म्हणतात तिथे येऊन आपण पोहचतो. त्यापुढे सहन करत राहणं ह्या शिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो कारण आपल्यावर जबाबदाऱ्या आलेल्या असतात. टिपिंग पॉइंट पर्यंत पोहचण्या आधीच आपण बाहेर पडू शकतो का? स्वतः साठी वेगळे पर्याय शोधू शकतो का? कुठलं काम आवडत आहे ह्याचा शोध आधीच घेऊन ठेऊ शकतो का ? comfort zone च्या बाहेर पडायला काय लागत ? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न ह्या भागात आपण केला आहे. आजची आपली पाहुणी शरयू सावंत हि अनेक वर्षांचा कॉर्पोरेट अनुभव घेऊन आता स्वतः एक लाईफ कोच बनली आहे आणि ती लोकांना आणि विशेषतः महिलांना करिअर आणी व्यवसायासंबंधी कोचिंग करते. Instagram: https://www.instagram.com/iamsharayusawant PODCAST LINK: Apple Podcast: https://apple.co/3g9fekx Spotify: https://spoti.fi/3gpYdS5 FREE EBBOK: 'EMBODIED SUCCESS' The Art of Overcoming Limitations & Stress to Achieve Greater Success & Abundance https://go.sharrayu.com/ebook-optin पुस्तकं विकत घेण्यासाठी लिंक्स जो जे वांछील - https://amzn.to/3QVShUq पॉडकास्टिंग - डिजिटल आवाजाची दुनिया - https://amzn.to/49DUj2X ऑडिओ लोगो क्रेडिट - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_ #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message
EP 60 - Resilience | हिरु ओनाडा ची गोष्ट
29-10-2023
EP 60 - Resilience | हिरु ओनाडा ची गोष्ट
गोष्ट ऐकायला आवडत नाही असा माणूस सापडणे कठीण. आजीच्या मांडीवर डोकेठेवून, शाळेच्या बाकावर, कॉलेज च्या कट्ट्यावर किंवा ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये कुठेही आपल्याला गोष्टी ऐकायला आवडतात. आपल्या पॉडकास्टच्या नावातच कट्टा असल्यामुळे इथे गोष्टी असणारच. आपण नेहमी प्रेरणादायी लोकांच्या गोष्टी त्यांच्या आवाजात ऐकतो, आज एक नवीन प्रयोग करून बघतो आहे. माझ्या आवाजात एक गोष्ट सांगायचं हा प्रयत्न आहे. आत्ता पर्यंत माझ्या प्रयोगांना तुमची साथ मिळाली आहेच, आता पण द्याल अशी विनंती करतो आणि आशा करतो. ऑडिओ लोगो क्रेडिट - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/ #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी गोष्टी - स्वप्नरंजन - प्रकटीकरण --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message
कचऱ्यातून रोजगार आणि उद्योगनिर्मिती - EP - 59 - Amita Deshpande - reCharkha - The EcoSocial Tribe
21-10-2023
कचऱ्यातून रोजगार आणि उद्योगनिर्मिती - EP - 59 - Amita Deshpande - reCharkha - The EcoSocial Tribe
कचऱ्यातून रोजगार आणि उद्योगनिर्मिती - EP -५९ - Ft अमिता देशपांडे ( Amita Deshpande - reCharkha - The EcoSocial Tribe) आपण जगात कुठेही गेलो तरी प्रत्येक शहराच्या बाहेर, इतकंच काय छोट्या गावांच्या ही बाहेर एक डम्पिंग यार्ड, म्हणजे तिथला कचरा डंप करण्याची जागा असतेच. ह्याला लँडफिलही म्हणतात. तुम्ही जर देवनार- मुंबई, उरुळी देवाची - पुणे, भांडेवाडी - नागपूर , मोशी - PCMC हि ठिकाणं ( किंवा इतर कुठलेही डम्पिंग यार्ड) बघितली असतील तर तुम्हाला लक्षात येईल की आपला कचरा डंप करायला किती मोठी जागा लागते. असं म्हणतात सध्या भारतातल्या सगळ्या डम्पिंग यार्ड चे एकूण क्षेत्रफळ हे पुणे शहरा एवढे आहे, २०३० मध्ये ते बंगलोर शहरा एवढे आणि २०५० पर्यंत दिल्ली एवढे होणार आहेत. आपल्या देशात जिथे जमिनीची किंमत खूप जास्त आहे, बहुसंख्य लोकांकडे स्वतःची जमीन नाही आहे, तिथे एवढ्या मोठ्या जागेचा वापर कचरा डंप करण्यासाठी आपण करतो आहे ह्याचा अर्थ आपलं काही तरी चुकतं आहे. कचरा मुळात कमी तयार होणं आवश्यक आहेच, आणि त्यासाठी काय बदल करावे लागतील ह्या बद्दल आपण ह्या भागात चर्चा केली आहेच, पण त्याच बरोबर कचरा कमी करूनही उरलेला कचरा, कसा रोजगारनिर्मिती करून देऊ शकतो आणि अमिता देशपांडे हिने, कचऱ्यातून ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती आणि wealth creation कशी होऊ शकते ह्याचं उत्तम उदाहरणं तिच्या recharkha ह्या उपक्रमातून कसं घालून दिलं आहे ह्या बद्दलही गप्पा केल्या आहेत. REcharkha - https://www.recharkha.org इंस्टाग्राम - https://www.instagram.com/recharkha_ecosocial/ YouTube - https://youtube.com/@myecosocialplanetrecharkha8692?si=Ut8mZPdAlT-ogqDp ऑडिओ लोगो क्रेडिट - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/ #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message
Comfort Zone च्या बाहेर येऊन काम करावं का ? EP 58 - Ft Saumitra Pote & Niranjan Medhekar
14-10-2023
Comfort Zone च्या बाहेर येऊन काम करावं का ? EP 58 - Ft Saumitra Pote & Niranjan Medhekar
ठेविले अनंते तैसेचि राहावे.. जे आहे त्यात सुखी असं जे वागतात आहे ना आणि ज्यांना आजच्या काळात खरंच, मनापासून असं वाटतं आहे ना, त्यांना माझा सलाम. आजच्या aspirational जगात आपल्यापैकी जास्तीत जास्त लोकांना काही तरी वेगळं, चांगलं करायची इच्छा होत असते. पण जास्तीत जास्त लोकांची हि इच्छा मनात किंवा बोलण्यातच राहते, ती कृतीत उतरत नाही. ह्याचं कारण म्हणजे कृती करणं सोपं नसतं, त्या साठी आपल्या comfort zone च्या बाहेर पडावं लागतं, मेहेनत करावी लागते आणि थोडी रिस्क पण घ्यायला लागते. सौमित्र पोटे आणि निरंजन मेढेकर हे दोघे माझे सह पॉडकास्टर आणि मराठी पॉडकास्टर ग्रुपचे सदस्य आहेच त्याच बरोबर माझे मित्र पण आहेत. ह्या दोघांमधला कॉमन दुआ म्हणजे, हे दोघेही mainstream media मधले मोठे ब्रँड सोडून नवीन माध्यमांकडे वळले. कसा होता हा प्रवास, comfort zone सोडायला काय लागतं ? पॉडकास्ट आणि नवीन मीडिया माध्यमांचे फायदे अश्या अनेक विषयांवर गप्पा केल्या आहेत आजच्या ह्या भागात. सौमित्र पोटे चा मित्रम्हणे हा पॉडकास्ट सध्या खूप गाजतो आहे, तर निरंजन हा एक उत्तम कादंबरीकार बनला आहे, त्याचे पुस्तक स्टोरीटेल आणि पुस्तकं स्वरूपात उपलब्ध आहेत, त्याच बरोबर मराठी crime कथा हा त्याचा पॉडकास्ट नक्की ऐकण्यासारखा आहे. [ comfort zone, career risk, stagnation, growth, inspiration, new age media, podcasting ] #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी ऑडिओ लोगो क्रेडिट - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/ --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message
पोलिसांकडून आपल्याला हे शिकायला मिळतं.. EP 57 - Ft PRAMOD PHALNIKAR
07-10-2023
पोलिसांकडून आपल्याला हे शिकायला मिळतं.. EP 57 - Ft PRAMOD PHALNIKAR
श्री प्रमोद श्रीपाद फळणीकर हे मध्यप्रदेश कॅडर चे IPS ऑफिसर. त्यांनी तिथे अनेक ठिकाणी सेवा दिली. त्यानंतर ते ITBP ( इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस ) ; NSG ( नॅशनल सेक्युरिटी गार्ड ) ; CISF ( सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स ) अश्या महत्वाच्या संस्थांमध्ये काम केलं. CISF मध्ये असताना संपूर्ण भारतातल्या विमानतळांची सुरक्षा त्यांच्या अधिकाराखाली होती. त्यांच्या करिअर मध्ये अनेक रोमांचक घटना घडल्या, पण इन्स्पिरेशन कट्टा वर गप्पा मारताना आपण सरांकडून जास्तीत जास्त शिकता येईल ह्या उद्देशाने त्या घटनांवर एपिसोड आधारित न ठेवता पोलिसांकडून एकंदरीत आपण सर्वसामान्यांना काय शिकता येईल ह्या बद्दल चर्चा केली. IPS मध्ये त्यांची सुरवात थोडी उशिरा झाली, त्यामुळे त्यांना काही अडचणी आल्या का ? करिअर मध्ये एखादी गोष्ट मिळायला उशीर झाला तर त्यांनी पुढच्या आयुष्यात काही नुकसान होतं का ? त्याच्याशी कसं डील करायचं ? आपल्याला वाटतं आयुष्यात कुठलही शिक्षण पूर्ण करणं म्हणजे परीक्षा पास होण. पण IPS झाल्यावरही सतत अभ्यास करायला लागतो, update राहायला लागतं. इतक्या व्यस्त दिनक्रमांतून ते नवीन शिक्षणाला कसं प्राधान्य देतात ? सिव्हिलिअन्स स्वतःला update ठेऊ शकतात का ? जो माणूस फील्ड work करतो त्याला paper work चा खूप कंटाळा येतो, पण पोलिसांना दोन्ही काम करणं क्रमप्राप्त होत. हे कसं जमतं ? आपल्याला वाटतं आपला जॉब हा thankless आहे, पण law enforcement agencies पेक्षा जास्त thankless job कोणाचा असू शकेल? असं असलं तरी काम करायचं inspiration कसं मिळतं ? अश्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा करून सरांकडून खूप छान शिकायचा हा प्रयत्न.. सरांचा मोबाईल नंबर - ९००११९४३६७४ #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी ऑडिओ लोगो क्रेडिट - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/ --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message
पॉडकास्ट मधून प्रबोधन - EP 56 - Ft Dwitiya Sonavane , Shilpa Yadnopavit , Mukta Chaitanya
29-09-2023
पॉडकास्ट मधून प्रबोधन - EP 56 - Ft Dwitiya Sonavane , Shilpa Yadnopavit , Mukta Chaitanya
कुठल्याही इतर माध्यमांसारखं इंटरनेट हे दुधारी तलवारीसारखं आहे. त्याचा चांगला आणि वाईट अश्या दोन्ही प्रकारे वापर करून घेता येतो. इंटरनेट मुळे सोशल मीडिया, गेमिंग आणि इतर गोष्टींमागे वाहावत गेलेली लोकही आपण बघतो, तेच इंटरनेट चा वापर करून आपला घरगुती उद्योग वाढवायला आणि स्वतःसाठी काहीतरी नवीन शिकायला केलेला वापर हि आपण बघतो. पॉडकास्ट हे ह्या इंटरनेट मुळे आपल्याला मिळालेले एक उत्तम माध्यम आहे ह्या बाबत आता कोणाला काही शंका उरली नसेल. ट्रॅफिक मध्ये गाडी चालवताना, सकाळी वॉल्क करताना, स्वयंपाक करताना, प्रत्येक वेळेस मनोरंजनासाठी काही तरी ऐकण्या पेक्षा तो वेळ स्वतःसाठी काही तरी नवीन माहिती किंवा शिक्षण घेण्यासाठी वापरू शकतो हि संकल्पना आता हळू हळू लोकांना पटू लागली आहे. पण सगळ्याठिकाणी असतं तसंच, इथेही आहेच, मुर्गी पहेले की अंडा ? श्रोते पहिले येतील का निर्माते ? मला विचारालं तर श्रोते येतातच, चांगले निर्माते हवे. इकोसिस्टिम तयार व्हायला हवी. आम्ही मराठी पॉडकास्टर्स मिळून ह्या साठी प्रयत्न करतोच आहे. त्याचा भाग म्हणून माझ्या श्रोत्यांना इन्स्पिरेशन कट्टा सारखे ( सेल्फ हेल्प ) काही तरी नवीन माहिती / शिक्षण देणारे इतर काही पॉडकास्ट बद्दल माहिती व्हावी म्हणून आजच्या पॉडकास्ट दिनानिमित्य हा एपिसोड. मला सगळ्याच माझ्या मित्र मैत्रिणींना ह्या एपिसोड मध्ये सामील करून घ्यायला आवडलं असतं, पण ते तांत्रिक कारणांमुळे शक्य नव्हतं, त्यामुळे www.marathipodcasters.com ह्या संकेत स्थळाला नक्की भेट द्या, आणि ज्या पॉडकास्ट अँप वर तुम्ही पॉडकास्ट ऐकता तिथे पण मराठी पॉडकास्ट search करून नक्की ऎका. ह्या भागात सहभागी लोकांच्या पॉडकास्ट लिंक्स १) ग्रंथप्रेमी ( द्वितीया सोनावणे ) - https://open.spotify.com/show/0A0NHhV6vFMcFnGviiVJMV?si=b68799c70eb34766 २) सेल्फलेस पॅरेंटिंग ( शिल्पा यज्ञोपवीत ) - https://open.spotify.com/show/44WAmxWEvQYLK08HOR3BZ4?si=44e52892f8964453 ३) स्क्रीन टाइम विथ मुक्ता ( मुक्ता चैतन्य ) - https://open.spotify.com/show/1Yobz8YuodSOYDtraKamOe?si=a112a9ac51e14867 #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी ऑडिओ लोगो क्रेडिट - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/ --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message
पालक आणि विद्यार्थी मित्रानो - जरा आमचं 'ऐकाकी' - EP 55 - SACHIN PANDIT
24-09-2023
पालक आणि विद्यार्थी मित्रानो - जरा आमचं 'ऐकाकी' - EP 55 - SACHIN PANDIT
वर्गात काय शिवतात ते समजतं नाही आहे? समजलं आहे पण खूप आधीच्या धड्यांचा विसर पडला आहे? परीक्षेआधी परत कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली उजळणी करायची आहे ? स्क्रीन कडे न बघता अभ्यास अभ्यास करायचा आहे ? अंध विद्यार्थ्यांना पुस्तकाचा पर्याय हवा आहे ? ह्या सगळ्याच उत्तर म्हणजे श्राव्य रूपात समजावून सांगितलेले पाठ्यपुस्तकातील धडे. हीच संकल्पना घेऊन सचिन पंडित ह्यांनी 'ऐकाकी' अँप ची सुरवात केली. ह्या अँप मुले वरील सर्व समस्यांसाठी एक उपाय मिळाला. हि अँप सुरु करताना केलेले सर्वे, विद्यार्थी -पालक - शिक्षक ह्यांच्याशी झालेले संवाद, ह्यातून सचिनला अनेक नवीन समस्यांबद्दल माहिती मिळाली, ती माहिती आणि त्याबद्दल संभाव्य उपाय लोकांसमोर आणायला सचिनने एक पॉडकास्ट पण सुरु केला. ऐकाकी अँप, पॉडकास्ट, विद्यार्थी -पालक - शिक्षक ह्यांच्या समस्या, त्यावर उपाय, श्राव्य रूपात शिक्षणाचे भविष्य ह्या सगळ्यावर चर्चा केली आहे इन्स्पिरेशन कट्टाच्या ५५ व्या भागात उद्योजक आणि पॉडकास्टर सचिन पंडित ह्यांच्याशी. ऐकाकी अँप लिंक्स - https://apps.ikakey.com/ ऐकाकी पॉडकास्टच्या लिंक्स - https://tinyurl.com/ikakeySPOTIFY https://tinyurl.com/ikakeyAPPLE #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी ऑडिओ लोगो क्रेडिट - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/ --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message
EP 54 - साठाव्या वाढदिवसाला चक्क ६०KM धावल्या - Ft Vidula Tokekar
17-09-2023
EP 54 - साठाव्या वाढदिवसाला चक्क ६०KM धावल्या - Ft Vidula Tokekar
निसर्गोपचार - भाग ५४ - विदुला टोकेकर / EP 54 - Vidula Tokekar तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे, पण वेळ मिळत नाही आहे. वयाच्या चाळीशीत, तिशीत किंवा अगदी विशीत थकवा जाणवतो आहे ? एनर्जी, स्टॅमिना कमी होताना जाणवतो आहे. तर मग हा एपिसोड तुमच्या करता आहे. अगदी नैसर्गिक पद्धतीने निरोगी कसं राहता येतं, निषारोपचार पद्धत नेमकी काय आहे, सुरवात कुठून करावी अश्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे विदुला टोकेकर ह्यांच्याशी. त्यांनी सुचवलेले पुस्तक - स्वाधीन स्वास्थ्य महाविद्या by आचार्य को लक्ष्मण शर्मा this is the bible of Naturopathy. विदुला टोकेकर ह्यांच्या कडून निसर्गोपचारा बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, त्यांची अपॉइंटमेंट इथे बुक करू शकता - https://tidycal.com/vidulatokekar/prakruti-free-consultation प्रकृती पॉडकास्ट ची लिंक - https://open.spotify.com/show/4ZbMaCk5q2FfWH5h01AIsr?si=deaff9286ce546d3 #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी ऑडिओ लोगो क्रेडिट - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/ --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message
EP 53 - लॉकडाउन चे फायदे !!
21-03-2023
EP 53 - लॉकडाउन चे फायदे !!
भाग ५३ -लॉकडाउन चे फायदे !! २२ मार्च २०२० म्हणजे आज पासून ३ वर्षांपूर्वी जनता curfue आपण पाळला होता, आणि लगेच दुसऱ्यादिवशी पासून lockdown ची सुरवात झाली. आधी काही दिवसांचा वाटणारा lockdown पुढे अनेक महिने चालला. हा काळ अनेक लोकांसाठी अतिशय कठीण असा काळ होता, खूप लोकांना खूप अडचणी आल्या. आपण कल्पनापण करू शकणार नाही अश्या गोष्टी घडल्या. हे सगळं असं असताना, काही लोकांनी मात्र वेळेचा चांगला उपयोग करून, काही तरी नवीन उपक्रम सुरु केले. काही तरी नवीन शिकून स्वतःच्या आयुष्याला नवीन वळण दिलं. ज्या लोकांनी ह्या lockdown चा blessing in disguise ह्या तत्वावर फायदा करून घेतला त्या लोकांच्या stories आपण इन्स्पिरेशन कट्ट्यावर आणतो आहे. त्यातला हा पहिला भाग. #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी आमच्या वेबसाईट ला नक्की भेट द्या - https://marathipodcasters.com मी पॉडकास्टर  - https://www.instagram.com/mipodcaster/ ई-मेल - inspiration.katta@gmail.com ह्या भागाचे प्रयोजाय - प्रफुल्लता प्रकाशन देवयोद्या हि कादंबरी इथे ऑर्डर करू शकता You can also order this book online here : https://granthpremi.com/products/devyoddha तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी पर्यायासाठी अमेझॉन वर ऑर्डर करू शकता. http://bitly.ws/yLa2 ही कादंबरी तुम्ही WhatsApp मेसेज करुन अथवा फोन वर कॉल करून देखील ऑर्डर करू शकता. COD (कॅश ऑन डेलिव्हरी) सुविधा उपलब्ध! फोन नंबर - ९६२३२१८६२५ / ऑडिओ लोगोस - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/ --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message
EP 52 - जुन्या लग्नाची नवी गोष्ट
12-02-2023
EP 52 - जुन्या लग्नाची नवी गोष्ट
फेब्रुवारी महिना, गुलाबी थंडी आणि उद्यावर आलेला valentine's day.. छान रोमँटिक गाणे आठवतात आहे ना?  पहिलं प्रेम आठवतं आहे का? आपले किंवा मित्रांचे प्रेमभंग आठवतात आहे का? अश्यातच पुढे अनेकांचे प्रेमविवाह पण झाले असतील आणि काहींचे विवाहानंतर प्रेमही.. लग्न होत, हनिमून होतं, पाहिलं वर्ष छान उत्साहात जातात, आणि मग हळू हळू बारीक सारीक गोष्टी कळायला लागतात.  रोज दारू पिण्याची अगदी भयंकर सवय असो किंवा ओला टॉवेल गादीवर ठेवायची छोटी पण irritating सवय.  खटके उडायला सुरूवत होते, मग त्याचं रूपांतर भांडणात आणि कधी कधी घटास्पोटात पण.. १० वर्षांच्या relationship नंतर माझा घटस्फोट होईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. माझ्या जवळच्या नात्यातील अजून एकाचं लग्नाला १२ वर्ष झाल्यावर घटस्फोट झाला. अनेक मित्रं मैत्रीच्या कडे अशी परिष्टित असल्याचे ऐकिवात आहे.. का होत आहे असं? Mid life divorce ची संख्या वाढते आहे का? पस्तिशी येता येताच married life एकसंध आणि बोरिंग व्यायला लागली आहे का? काय कारण आहेत ह्याची? आणि हे बदलायच असेल तर काय उपाय आहे?  ह्या एका महत्त्वाच्या विषयावर हा valentine's day special episode.. #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी #sleep #qualitysleep #wakingupearly #लवकरउठणे आमच्या वेबसाईट ला नक्की भेट द्या - https://marathipodcasters.com मी पॉडकास्टर  - https://www.instagram.com/mipodcaster/ ई-मेल - inspiration.katta@gmail.com ह्या भागाचे प्रयोजाय - प्रफुल्लता प्रकाशन देवयोद्या हि कादंबरी इथे ऑर्डर करू शकता You can also order this book online here : https://granthpremi.com/products/devyoddha तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी पर्यायासाठी अमेझॉन वर ऑर्डर करू शकता. http://bitly.ws/yLa2 ही कादंबरी तुम्ही WhatsApp मेसेज करुन अथवा फोन वर कॉल करून देखील ऑर्डर करू शकता. COD (कॅश ऑन डेलिव्हरी) सुविधा उपलब्ध! फोन नंबर - ९६२३२१८६२५ / ह्या भागात सहभागी लोकं १) लीना परांजपे   - https://www.instagram.com/leennaparannjpe/ २) चित्कला मुळे  - https://www.instagram.com/relationshipcoachchitkala/ ३) डॉ प्रसन्ना गद्रे  - https://www.instagram.com/prasannagadre20021971/ शेर क्रेडिट्स  - सुखंन  ऑडिओ लोगोस - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/ --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message
EP 51 - सकाळी लवकर उठावे का? / Sleep and Waking up early
30-01-2023
EP 51 - सकाळी लवकर उठावे का? / Sleep and Waking up early
५१ सकाळी लवकर उठावे का? अनेक दिवसांपासून, infact अनेक महिन्यांपासून सकाळी लवकर उठण्याचा मी प्रयत्न करतो आहे, पण काही जमलं नाही बुआ.. मग ठरवलं ह्या विषयावर एपिसोड करायचा. सुरवातीला लोकांना त्याचे फायदे विचारात गेलो, पण नंतर हळू हळू लक्षात आलं की मी प्रश्नच चुकीचा घेतला आहे !  लवकर उठणे हा विषय असूच शकत नाही.. झोप हा मुख्य विषय आहे.. quality झोप म्हणजे काय, ती किती वेळची असायला हवी,  झोपेची वेळ, कशी मिळू शकते अश्या सगळ्या गोष्टींवर चर्चा करणं आवश्यक ठरलं. ह्या विषयावर आयुर्वेद, आहारशास्त्र, निसर्गोपचार, मानसशास्त्र काय म्हणत ह्या बद्दल ह्या एपिसोड मध्ये cover करायचा प्रयत्न केला आहे.. #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी #sleep #qualitysleep #wakingupearly #लवकरउठणे  आमच्या वेबसाईट ला नक्की भेट द्या - https://marathipodcasters.com मी पॉडकास्टर  - https://www.instagram.com/mipodcaster/ ई-मेल - inspiration.katta@gmail.com  ह्या भागाचे प्रयोजाय - प्रफुल्लता प्रकाशन  देवयोद्या हि कादंबरी इथे ऑर्डर करू शकता  You can also order this book online here :https://granthpremi.com/products/devyoddha तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी पर्यायासाठी अमेझॉन वर ऑर्डर करू शकता. http://bitly.ws/yLa2 ही कादंबरी तुम्ही WhatsApp मेसेज करुन अथवा फोन वर कॉल करून देखील ऑर्डर करू शकता. COD (कॅश ऑन डेलिव्हरी) सुविधा उपलब्ध! फोन नंबर - ९६२३२१८६२५ / ह्या भागात सहभागी लोकं  १) डॉ कीर्ती पुराणिक तारे   - https://www.drkirti-arogyam.com/ २) अवंती दामले - https://www.instagram.com/avantidamle/ ३) डॉ यश वेलणकर - https://www.linkedin.com/in/yash-velankar-83362510/ ४) विदुला टोकेकर  - https://www.instagram.com/vidulatokekar/ ५) मुक्त चैतन्य  - https://www.instagram.com/muktachaitanya/ विशेष आभार - प्रकाश अय्यर ( the habit of winning ) ह्या पुस्तकातून अलार्म आणि स्नूझ ह्या बद्दल प्रेरणा मिळाली  - अंकुर वारिकू ह्याच्या पुस्तकातला भाग त्याला क्रेडिट देऊन वापरला आहे.   ऑडिओ लोगोस - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/ --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message
EP 50 - लोक काय म्हणतील ?
15-01-2023
EP 50 - लोक काय म्हणतील ?
#Golden jubilee  Inspiration katta चे ५० एपिसोड झालेत.. काही लोक म्हणतील इतका वेळ कसा लागला ५० एपिसोड साठी, तर काही म्हणतील इतक्या लवकर झालेत! लोक काहीतरी बोलणारच. पहिल्या एपिसोड च्या आधीची माझी स्थिती मला अजूनही आठवते.. इतका घाबरलो होतो मी, की शेवटच्या क्षणापर्यंत मला वाटतं होत की ऑडियो फाईल डिलीट करावी.. मी कधीच माईक हातात घेतला नव्हता, माझा आवाज काही चांगला नव्हता, माझा कॉन्फिडन्स खूप कमी होता आणि मुख्य म्हणजे माझ्या आयुष्यात ज्या घटना घडत होत्या त्यांना पाहून मी 'inspiration' असं नाव असलेला काही सुरू करतो आहे, हे पाहून तर लोक नक्कीच हसणार होते..  त्या दिवसाआधी लोक काय म्हणतील ह्या भीतीने मी बरेचदा काही वेगळं केलंच नाही आणि अनेक वेळा उचललेले पाऊल पण परत घेतले होते. पण inspiration katta नी माझी लाईफ बदलली.. त्या दिवसापासून मी एकच धोरण अवलंबिले, ते म्हणजे, लोक गेले #@&* तुमच्या आयुष्यात कधी घडलं आहे का असं काही?  लोक काय म्हणतील या भीतीने काही करायला घाबरला आहात का?  आणि फक्त लोक चांगलं म्हणतात म्हणून मनाविरुद्ध एखादी गोष्ट केली आहे?  आजचा हा एपिसोड आहे ह्याचं विषयावर.. नक्की ऐका. PS: - Golden Jubilee च gift म्हणून Inspiration Katta la Spotify, Apple Podcast, Gaana, Jio Saavn, Amazon Music, Audible, Spotify, Biengpod, Wynk, Hungama, YouTube जिथे शक्य असेल तिथे सगळी कडे 5* rating द्या आणि follow करा.. #inspirationkatta #मराठी#marathipodcast #podcast #podcasting #newyearresolution #procrastination #perfectionism #perfectionist आमच्या वेबसाईट ला नक्की भेट द्या - https://marathipodcasters.com मी पॉडकास्टर  - https://www.instagram.com/mipodcaster/ ई-मेल - inspiration.katta@gmail.com ह्या भागाचे प्रयोजाय - Translation Panacea - http://www.translationpanacea.in ह्या भागात सहभागी लोकं १) मिलिंद जाधव  - https://www.instagram.com/lifecoachmilindjadhav/ २) बिजय गौतम- https://www.instagram.com/bijayspeaks/ ३) के डी सुषमा  - https://www.instagram.com/kdsushma_/ ४) राहुल नार्वेकर - https://www.instagram.com/rahulbnarvekar/ ५) मेहक मिर्झा प्रभू - https://www.instagram.com/mehak.mirza.prabhu/ विशेष आभार - प्रकाश अय्यर ( the habit of winning ) ह्या पुस्तकातून काही वाक्यांसाठी  प्रेरणा मिळाली आहे. ISRO sound credit - https://youtu.be/yRK_AqSeHLQ 3 Idiots sound credits - https://youtu.be/P1qdBvMSDR4 ऑडिओ लोगोस - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/ --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message
EP 49 - PERFECTIONISM - PROCRASTINATION LOOP - दिरंगाई/ चालढकल - पार्ट ३
08-01-2023
EP 49 - PERFECTIONISM - PROCRASTINATION LOOP - दिरंगाई/ चालढकल - पार्ट ३
बरेचदा एखाद काम, हवं तेवढं उत्तम प्रकारे करता येत नाही आहे, ह्या भीतीने आपण ते काम करायचं नाही. ते काम कसं होणार आहे किंवा तुमच्याकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत, ह्याच्याशी त्याचा काहीही संबंध नसतो. फक्त आपल्या त्याच्या रिझल्ट्स बद्दल असलेल्या अपेक्षांमुळे ते काम आपण पुढे ढकलत असतो. खरतर ते काम पुढे ढकलून ते नंतर चांगल्या पद्धतीने होणार नसतंच, तरीही आपण ते पुढे ढकलतो.  मी लेखन आज चालू केलं काय की दोन महिन्यांनी, ह्या दोन महिन्यात मी काही वेगळा अनुभव किंवा शिक्षण घेणार नसेल तर माझे लिखाण दोन महिन्याने तसेच होणार आहे. आणि हे असं होणार आहे, हे मला माहिती असून मी ते पुढे ढकलतो.  Perfection आणि Procrastination ह्याचा फार बेकार लूप आहे. त्यात जो अडकला, त्याला बाहेर येणं कठीण आहे. ह्या loop मधून बाहेर यायला काय करायला हवं, ह्या वर आजच्या एपिसोड मध्ये चर्चा केली आहे. त्याचं शिवाय, एकच वेळी जेंव्हा अनेक गोष्टी करणं आवश्यक असतं, त्या वेळी काय करावं, priority कशी ठरवावी, ह्यावर पण ह्या episode मध्ये चर्चा केली आहे.. #inspirationkatta #मराठी#marathipodcast #podcast#podcasting #newyearresolution#procrastination #perfectionism#perfectionist आमच्या वेबसाईट ला नक्की भेट द्या - https://marathipodcasters.com मी पॉडकास्टर  - https://www.instagram.com/mipodcaster/ ई-मेल - inspiration.katta@gmail.com ह्या भागाचे प्रयोजाय - Translation Panacea - http://www.translationpanacea.in ह्या भागात सहभागी लोकं  १) मिलिंद जाधव  - https://www.instagram.com/lifecoachmilindjadhav/ २) बिजय गौतम- https://www.instagram.com/bijayspeaks/ ३) मधुरा बाचल - https://www.instagram.com/madhurasrecipe/ ४) आरती बारसोडे - https://www.linkedin.com/in/arati-b-84a0175/ ५) मेहक मिर्झा प्रभू - https://www.instagram.com/mehak.mirza.prabhu/ FIFA world cup Sound credits - https://youtu.be/mEV2zsubLd4 विशेष आभार - प्रकाश अय्यर ( the habit of winning ) ह्या पुस्तकातून काही वाक्यांसाठी  प्रेरणा मिळाली आहे.  ऑडिओ लोगोस - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/ --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message
EP 48 - Procrastination / दिरंगाई/ चालढकल - Part 2
01-01-2023
EP 48 - Procrastination / दिरंगाई/ चालढकल - Part 2
Episode ४७ मध्ये आपण बघितलं की दिरंगाई, चालढकल, procrastination आपण का करतो, त्यामुळे काय नुकसान होऊ शकतं. त्याची कारणे काय ह्या विषयावर आपल्या काही guest बरोबर चर्चा केली.  ह्या एपिसोड मध्ये आपण दिरंगाई, चालढकल न करता काम कसं करता येईल ह्या विषयावर चर्चा केली आहे. #procrastination #चालढकल #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी  आमच्या वेबसाईट ला नक्की भेट द्या - https://marathipodcasters.com मी पॉडकास्टर  - https://www.instagram.com/mipodcaster/ ई-मेल - inspiration.katta@gmail.com  ह्या भागाचे प्रयोजाय - Translation Panacea - http://www.translationpanacea.in ह्या भागात सहभागी लोकं  १) मिलिंद जाधव  - https://www.instagram.com/lifecoachmilindjadhav/ २) डॉ यश वेलणकर - https://www.linkedin.com/in/yash-velankar-83362510/ ३) निरंजन मेढेकर - https://www.instagram.com/niranjan_selfmed/ ४) आरती बारसोडे - https://www.linkedin.com/in/arati-b-84a0175/ ५) मुक्त चैतन्य  - https://www.instagram.com/muktachaitanya/ विशेष आभार - प्रकाश अय्यर ( the habit of winning ) ह्या पुस्तकातून अलार्म आणि स्नूझ ह्या बद्दल प्रेरणा मिळाली  ऑडिओ लोगोस - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/ --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message
EP 47 - PROCRASTINATION- चालढकल - दिरंगाई / PART 1
25-12-2022
EP 47 - PROCRASTINATION- चालढकल - दिरंगाई / PART 1
१ जानेवारी जवळ येतो आहे ! काही संकल्प केला आहे का नवीन वर्षासाठी ? मागच्या वर्षी केला होतात का ? मागच्या वर्षीच्या संकल्पचे काय झालं ? आपण नवीन काम किंवा चांगलं काम 26 डिसेंबरला किंवा अगदी 13 फेब्रुवारीला का सुरू करू शकत नाही ?  चांगल्या कामासाठी, हितकर कामांसाठी नेहमी मुहूर्त का शोधल्या जातो ? चालढकल का होते ?  Procrastination ह्या गोंडस शब्दाचा नेमका अर्थ काय?  त्याची कारणं काय आहेत ? ते कशामुळे होतं आणि त्याचं नुकसान काय ?  या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आजचा हा आपला एपिसोड. या एपिसोड मध्ये इन्स्पिरेशन कट्टाच्या इतर एपिसोड प्रमाणे एक कोणी पाहुणा आलेला नाहीये तर अनेक लोकांचे छोटे छोटे बाईट्स घेतलेले आहेत. हा प्रयोग तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा आहे तर नक्की ऐका इन्स्पिरेशन कट्टाचा 47 वा भाग. #procrastination #चालढकल #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी  आमच्या वेबसाईट ला नक्की भेट द्या - https://marathipodcasters.com मी पॉडकास्टर  - https://www.instagram.com/mipodcaster/ ई-मेल - inspiration.katta@gmail.com  ह्या भागाचे प्रयोजाय - Translation Panacea - http://www.translationpanacea.in ह्या भागात सहभागी लोकं  १) मिलिंद जाधव  - https://www.instagram.com/lifecoachmilindjadhav/ २) लीना परांजपे - https://www.instagram.com/leennaparannjpe/ ३) डॉ यश वेलणकर - https://www.linkedin.com/in/yash-velankar-83362510/ ४) निरंजन मेढेकर - https://www.instagram.com/niranjan_selfmed/ ५) आरती बारसोडे - https://www.linkedin.com/in/arati-b-84a0175/ ६) मुक्त चैतन्य  - https://www.instagram.com/muktachaitanya/ विशेष आभार - प्रकाश अय्यर ( the habit of winning ) ह्या पुस्तकातून अलार्म आणि स्नूझ ह्या बद्दल प्रेरणा मिळाली  ऑडिओ लोगोस - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/ --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message
Screen Time - EP 46 -MUKTA CHAITANYA
19-10-2022
Screen Time - EP 46 -MUKTA CHAITANYA
एपिसोड  ४६ -  मुक्ता चैतन्य ( लेखक, पत्रकार )  Screen Time  आजकाल रात्री आपण झोपतो सगळे इंस्टाग्राम रील्स बघून झाले की, गेम च्या सगळ्या लाईफ संपल्याकी, सोशल मीडिया वर फारसा बघायचं काही राहिलं नाही की. झोप आली किंव्हा अमुक एक वेळ झाली म्हणून आपलं झोपणं आता बंद झालं आहे का? हे आपल्या बाबतीत किंव्हा आपल्या जवळच्या कोणाच्या बाबतीत होतं आहे का ? आपण स्क्रीन च्या आहारी गेलो आहोत का?  आपल्याला वाटतं त्या पेक्षा नक्कीच आपण त्याच्या आहारी गेलो आहोत..  जरी ह्यातून कुठल्याच वयाचे लोकं सुटले नाहीत तरी  सगळ्यात जास्त परिणाम होतो आहे teenagers आणि कॉलेज स्टुडंट्स वर.   गेम खेळणं, सोशल मीडिया वर चाट करणे, त्या साठी जागरण करणे, मग घरचे झोपले हे पाहून पॉर्न साईट explore करणे असे सगळे प्रकार घरो घरी होतोत.  प्रत्येकाला असंच वाटतं की आपलं मुलं अजूनही निरागस आहे आणि अजून तो किंवा ती असं काही करत नसेल.  आपण आपल्याला वाटतं तसं ते नसतं. ह्या सगळ्यातून पॉर्न addiction, गेमिंग च addiction, सोशल मीडिया वर भावनिक अवलंबन ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतात आणि त्याचे वाईट परिणाम हे दूरगामी असू शकतात.  नुकत्याच पुण्यात दोन दुर्दैवी घटना घडल्या त्यात 'सेक्सट्रोशन' हा नवीन प्रकार समोर आला, त्यात  दोन seperate घटनांमध्ये १९-२० वर्षाच्या मुलांनी आत्महत्या कारे पर्यंत गोष्टी गेल्या.  ह्या सगळ्याचे किती वाईट परिणाम होऊ शकतात. ते होऊ नये ह्या साठी काय उपाय करायला हवे ? पालकांनी कसा आपल्या मुलांशी संवाद साधावा अश्या अनेक विषयांवर गप्पा केल्या आहेत आजच्या ह्या भागात मुक्ता चैतन्य हिच्याशी  Screentime with Mukta YouTube channel - https://youtube.com/channel/UCWC_Rm8W4PXrg_bhLVkVwIA पुस्तकं विकत घेण्याची लिंक - https://www.amazon.in/dp/B08LSKX6HK/ref=cm_sw_r_wa_awdo_5Q4ZBZ3JV5D9BJ2E4C12 https://www.amazon.in/dp/B08KW8XHBX/ref=cm_sw_r_wa_awdo_856VKHK3RN7VE388KV6V Screentime English आणि मराठी तसेच पॉर्न खेळ पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क 9823388828 ब्लॉग - https://muktachaitanya.wordpress.com/  #screentime #मराठी #marathipodcast #inspiration #inspirationkatta #katta #कट्टा #muktachaitanya #nachiketkshire   --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message
खाणारे तोंड वाढतात आहे त्या बरोबर पिकवणारे हात पण वाढायला हवे - EP 45- Priya Bodke
09-10-2022
खाणारे तोंड वाढतात आहे त्या बरोबर पिकवणारे हात पण वाढायला हवे - EP 45- Priya Bodke
इन्स्पिरेशन कट्टा  भाग -४५ प्रिया बोडके नवीन पिढीतली शेतकरी   खाणारे तोंड वाढतात आहे त्या बरोबर पिकवणारे हात पण वाढायला हवे  शेतकरी म्हंटलं की माझ्या सारख्या शहरी माणसासमोर दोन परस्परविरोधी चित्र उभे राहतात.  एक म्हणजे शेतकरी आत्महत्या आणि दुसरं म्हणजे शहरालगतच्या आपल्या जागा विकून मोठाल्या गाड्यांतून फिरणारे माणसं.  शेतकऱ्याला कधी व्यवहार कळलाच नाही, उत्पादन खर्च किती ? आणि त्या नुसार विक्री किमंत किती हे बघण्यापेक्षा दलाल जो भाव देईल तो घ्यायचा आणि मग फायदा - नुकसान काहीही न कळता नुसती मजुरी करायची आणि मग त्यातून नैराश्य येऊन शेती विकायची किंव्हा आत्महत्या करे पर्यंत जावं हेच २०२२ मध्ये पण चालू आहे.  हे सगळं असं असल्यामुळे पुढची पिढी ४-५ हजाराची नौकरी करणार पण शेती करणार नाही.  पण एक अल्पभूधारक शेतकरी, अगदी छान काम करून, शहरी मध्यमवर्गीयांसारखं सन्मानजनक आयुष्य जगू शकतो, हे ज्ञानेश्वर बोडके ह्यांनी त्यांच्या अभिनव फार्मर्स क्लब ह्याच्या माध्यमातून करून दाखवलं आहे.  त्यांच्या बरोबरीने आता त्यांची पुढची पिढी ह्या मिशन मध्ये काम करते आहे. विशेष म्हणजे मुलगा प्रमोद ह्याच्या सोबत त्यांची मुलगी प्रिया हि पण एक शेतकरी आणि अभिनव फार्मर्स क्लब ची एक प्रमुख मेंबर म्हणून काम करते आहे.  एक आधुनिक शिक्षित मुलगी हि शेतकरी म्हणून काम करणं हे विलक्षण आहे.  आज तिच्याशी इन्स्पिरेशन कट्टा च्या ४५ व्या भागात आपण अनेक विषयांवर गप्पा केल्या आहेत. १) प्रियाने शेती हा व्यवसाय म्हणून का निवडला  २) शेतकऱ्यांची सद्य स्थिती  ३) अभिनव ग्रुपचं नेमकं काम  ४) त्यामुळे शेतकऱ्यांना झालेला फायदा  ५) शेती कोण करू शकतो, त्या साठी लागणारं शिक्षण अश्या अनेक विषयांवर गप्पा आपण आज केल्या आहेत App link - https://www.abhinavfarmers.club/ Website link - http://www.abhinavfarmersclub.com/ Our email id. - inspiration.katta@gmail.com --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message
श्राव्य माध्यमातून Narrative Storytelling - EP -44 - ADITYA KUBER
03-05-2022
श्राव्य माध्यमातून Narrative Storytelling - EP -44 - ADITYA KUBER
श्राव्य माध्यमातून Narrative Storytelling - EP - ४४ - आदित्य कुबेर  आज ४मे. आज इन्स्पिरेशन कट्टा ला २ वर्ष पूर्ण झालीत. मला कोणी विचारलं कि कसं वाटतं आहे, तर मी म्हणतो समाधान वाटतं आहे.  ह्या दोन वषार्त ० ते ४५ एपिसोड, ० ते ८०,००० listens , ० ते नेक्स्ट बिग क्रियेतर अवॉर्ड असा हा मस्त प्रवास राहिला आहे..  आता पुढच्या प्रवासाकडे सातत्याने चालत राहणार आहेच..  म्हणून आज anniversary च्या दिवशी पॉडकास्ट क्षेत्रात काय चालला आहे, श्राव्य माध्यमातून narrative storytelling कशी करता येते, त्याचे फायदे, ब्रँड ला त्याचा फायदा, अश्या विषयांवर गप्पा मारल्या आहेत आदित्य कुबेर ह्याच्याशी. आदित्य हा ideabrews studios चा founder आहे. Ideabrews पॉडकास्टींग क्षेत्रात creators आणि brands ह्यांचातला दुवा म्हणून काम करत आहे..   --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message
SOCIAL MEDIA - श्राप की वरदान | EP 43 SHARDUL KADAM
14-04-2022
SOCIAL MEDIA - श्राप की वरदान | EP 43 SHARDUL KADAM
SOCIAL MEDIA - श्राप की वरदान. सध्या शाळेत कश्या प्रकारचे निबंध लिहायला सांगतात माहिती नाही, पण जर माझ्या लहानपणी जर फेसबुक असतं तर ह्या विषयाचा निबंध नक्की लिहावा लागला असता. वापर करताना  ज्या कलाकारांना कधीही लोकांपर्यंत पोहचायचं माध्यम मिळालं नसतं, त्या कलाकारांना अगदी फुकटात अनेक लोकांपर्यंत पोहचता आलं. अनेक लहान व्यावसायिकांना आपला धंदा social media च्या माध्यमातून वाढवता आला.  जेव्हा जग लोकडोवन मध्ये होतं तेम्हा ह्या social media मुळे अनेक लोक आपलं पोट भरू शकले आणि ह्याच social मीडीया ने आपलं मनोरंजन पण केलं.  पण ह्याच social media मुळे अनेक लोकं खास करून teenagers एका virtual जगात बुडून गेले आहेत. टिकटॉक बॅन झाल्यावर किती लोकं रडले आणि काहींनी तर अगदी आत्महत्या पण केली अश्या काही बातम्या आल्या होत्या.  आपल्याला माहितीच आहे कोणतीच गोष्ट वाईट नसते, त्याचा वापर कसा होतो हे महत्वाचं आहे, आणि म्हणूनच social media चा वापर करताना balance ठेवणं खूप आवश्यक आहे.  Social media चा वापर जाहिरात करायला असा सुरु झाला, कुठल्या ब्रॅण्ड्स नी ह्याचा कसा वापर केला, social media consultant म्हणजे नक्की काय ? आता पुढे काय, अश्या सगळ्या विषयांवर गप्पा केल्या आहेत इन्स्पिरेशन कट्टा च्या ४३व्या भागात शार्दूल कदम ह्याच्याशी.  #marathipodcast #marathi #socialmedia  --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message